प्रतिनिधी/ बेळगाव
दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्था व सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कै. जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांची 220 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंदार मुतकेकर, संस्थेचे व्हा. चेअरमन विजय सांबरेकर, दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक कारेकर व सेक्रेटरी दीपक शिरोडकर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विनायक कारेकर यांनी स्वागत केले. अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर यांनी नाना शंकरशेट यांच्या कार्याचा आढावा घेतला. मंदार मुतकेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी दैवज्ञ सांस्कृतिक भवनाचे अध्यक्ष मारुती सांबरेकर, दैवज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघाचे अध्यक्ष प्रदीप अर्कसाली, कालिका दैवज्ञ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन कलघटकर, दैवज्ञ भगिनी मंडळाच्या अध्यक्षा संजना काकतीकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रकाश वेर्णेकर, राजू बांदिवडेकर, माणिक सांबरेकर, अमित सांबरेकर, दत्ता महागावकर, विशाल शिरोडकर उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुरा शिरोडकर यांनी केले. अभय हळदणकर यांनी आभार मानले.









