भाजप (BJP) विरोधात जे आहेत त्या सगळ्या विरोधकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रय़त्न आम्ही करत आहोत. सत्तेत देशाला उद्ध्वस्त करणारी व्यवस्था असून अराजकता माजली असल्याचे सांगून ती थांबवायची असेल तर भाजप विरोधात मोठी आघाडी निर्माण करावी लागेल. काहीजण आरोप करतात की मी प्रदेशाध्यक्ष य़ा नात्याने दादागिरी करत आहे पण आपण दादा नाही तर नाना असल्याचेही अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
आपल्या मुलाखतीत बोलताना नाना पटोले म्हणाले, “काही जण माझ्यावर दादागिरी करत असल्याचा आरोप करतात पण माझं नाव नाना असून दादा नाही. घरातील कुटुंब प्रमुखाला आपल्याकडे नाना म्हटलं जातं. मी कॉंग्रेस पक्षाला पुढे घेऊन जात असून माझी भूमिका सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची असून ती स्पष्ट आहे.” अशी बाजू मांडली.
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढून शिवसेनेला सर्वाधिक 21 जागा दिल्या जाणार असल्याच्या चर्चा असल्याच्या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “जागावाटपाचा कुठलाही निर्णय महाविकास आघाडीने अजूनतरी घेतलेला नाही. या सर्व बातम्या हवाई पुलाव आहेत. काही दिवसातच मी दिल्लीत जाणार असून हायकमांडशी यावर चर्चा करणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात काय करायचं याचा निर्णय घेऊ. महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांचा सन्मान होईल अशापद्धतीने जागावाटप करण्यात येईल” असंही नाना पटोले म्हणाले.
Previous Articleराजन साळवींच्या कुटुंबालाही ACB ची नोटीस, 20 मार्चला होणार चौकशी
Next Article तेजस्वी यादव 25 मार्चला सीबीआयसमोर हजर होणार








