ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई: छत्रपती संभाजीराजे (SambhajiRaje)यांनी काल राज्यसभेच्या उमेदवारीतून माघार घेतल्याने राज्यभरातून महाविकास आघाडीवर आरोप- प्रत्यारोप होत आहे. तर काही नेत्यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्य नाना पटोले (Nana Patole) यांनी ट्विट करत पाठिंबा जाहीर केला आहे. पटोलेंच्या ट्विटने महाविकास आघाडीत वैचारिक मतभेद असल्यांच चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे.
संभाजीराजे यांना पाठिंबा जाहीर करत पटोले ट्विटमध्ये म्हणतात की, संभाजीराजे खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्दैवी ! परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील. इतर पक्षांचे माहीत नाही परंतु संभाजीराजे राज्यसभेत जावेत अशी काँग्रेसची मनापासून इच्छा होती. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची एक वेगळी शान त्यांच्या नेतृत्वामुळे होती. ते खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्देवी. परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान या पोस्टवरून उलट-सुलट चर्चेला उधान आले आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस वेळ दिला होता तेव्हा काॅंग्रसने का निर्णय घेतला नाही. संभाजीराजेंनी माघार घेतल्यानंतर
काॅंग्रेसने पाठिंबा का जाहीर केला आहे?असा सवाल केला जात आहे. पटोलेंच्या या ट्विटनंतर विरोधक यावर भाष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेना ठामचं
राज्यसभेवर शिवसेनेचाचं उमेदवार असावा अशी अट शिवसेनेने घातली. संभाजीराजेंनी शिवबंधन बांधाव म्हणून मविआकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र संभाजीराजेंना मागचा अनुभव गाढीशी असल्याने अपक्ष लढण्यावर ते ठाम होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेली आॅफर नाकारत त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं काल पत्रकार परिषदेत जाहीर केलं. यावेळी त्य़ांना शिवसेनेचा पाठिंबा मिळाला नाही याविषयी खंत व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.