Nana Patole : एकीकडे प्रेत जळत होती आणि राजभवनामध्ये जयघोष सुरू होता. महाराष्ट्रातील कालचा काळा दिवस, यांना पाप करायचं होतं तर दोन चार दिवस मागेपुढे करून चालले असते.जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना राजभवनामध्ये जयघोष होता. भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टी भाजपने इंग्रजांसारख्या आत्मसात केल्यात. भ्रष्टाचाराच्या नवीन आयामाला ऑपरेशन लोटस असं नाव दिलं जातं.
याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. आज ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शरद पवार यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार असतात त्याचाच विरोधी पक्ष नेता होतो असे स्पष्ट केला आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पासून यासंदर्भातील निर्णय घेऊ.कालच्या राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेते पदाच्या पत्रावर कुठेही शिक्का नाही. राष्ट्रवादीने सादर केलेले पत्र खरं आहे की खोटे आहे बद्दल मी भाष्य करणार नाही. काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची उद्या बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते या संदर्भातला निर्णय उद्या होईल. वसंतदादांचे नाव घेऊन भाजपने राजकारण करू नये.
भय आणि भ्रष्टाचार या दोघांना घेऊन भटजी लोकांनी हे काम केलं आहे, असं नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
भटजींचे राजकारण काय असतं हे जनतेला कळल आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन विरोधी पक्षा संदर्भात निर्णय होईल. आत्तापासून हातातायी पणा राष्ट्रवादीने करू नये, असा सल्ला नाना पाटोले यांनी दिला. शरद पवार यांच्या आजच्या शक्ती प्रदर्शनाबद्दल काँग्रेस काही बोलणार नाही. काँग्रेस पक्षात कुठली भीती नाही त्यामुळे आम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही.त्यामुळे आमच्या पक्षात फूट पडेल असं मला वाटत नाही.
निसर्गाचे नुकसान असेल तिथे प्रकल्पाचे समर्थन काँग्रेस करणार नाही.कोकणातल्या निसर्गाला धोका पोहोचवून आम्ही कधीच रिफायनरी प्रकल्पाचा समर्थन करणार नाही.जो काँग्रेस सोबत असेल त्याला पुढे घेऊन आम्ही चालणार.जे नसतील त्यांना सोबत घेऊन जायचं कारण येत नाही. महाविकास आघाडी कायम राहील. 48लोकसभा आणि 288 विधानसभा यांची चाचणी काँग्रेस करते आहे.
महाराष्ट्रातील मूळ पक्ष काँग्रेसच,ही चाचणी आम्ही लपून नाही तर जाहीरपणे करतो आहे.पण ज्यावेळी महाविकास आघाडी होईल त्यावेळेला मित्रपक्षाला सुद्धा ताकद देण्याचे काम आम्ही करू असेही नाना पटोले म्हणाले.








