गदर : एक प्रेम कथा, अपने आणि गदर 2 यासारख्या हिट चित्रपटानंतर अनिल शर्मा पुन्हा एकदा नवा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. स्वत:चा पुत्र उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर यांच्यासोबत त्यांनी एक चित्रपट निर्माण केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘वनवास’ आहे. वनवास हा चित्रपट झी स्टुडिओच्या बॅनर अंतर्गत निर्माण करण्यात आला असून तो 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अनिल शर्मा हे स्वत:च्या पुत्राला बॉलिवुडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी दुसरी संधी या चित्रपटाद्वारे देत आहेत. कर्तव्य, सन्मान आणि स्वत:च्या कर्माचे परिणाम जीवनाला कशाप्रकारे आकार देतात हे या चित्रपटात दाखविले जाणार आहे. चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यात आले असून यात नाना पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा दिसून येत आहेत. ‘अपने ही देते हैं अपने को वनवास’ असा उल्लेख या पोस्टरवर आहे. वनवास चित्रपटात सिमरत कौर ही अभिनेत्रीही दिसून येणार आहे. यावेळी वेगळ्या शैलीसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सिमरत कौरने टेलरवर कॉमेंट करत म्हटले आहे.
Previous Articleमिनी सुएज कालव्याची निर्मिती इजिप्त करणार, मोठा खर्च येणार
Next Article कुकी दहशतवाद्यांकडून चार तास गोळीबार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









