दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता भारताचा पहिला बायोसायन्स चित्रपट ‘द व्हॅक्सीन वॉर’ तयार केला आहे. महामारी आणि लस निर्मितीच्या कहाणीच्या अवतीभवती घुटमळणारा वॅक्सीन वॉर या चित्रपटाचा ट्रेलर जारी करण्यात आला आहे.
द वॅक्सीन वॉर चित्रपटात कोविड-19 दरम्यानच्या अडचणींना दाखविण्यात आले आहे. याचबरोबर डॉक्टर आणि वैज्ञानिकांच्या लसनिर्मितीच्या संघर्षाशी जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी पल्लवी जोशी यांनी उचलली आहे. हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. द वॅक्सीन वॉर चित्रपटात अनुपम खेर, नाना पाटेकर, राइमा सेन, सप्तमी गौडा आणि पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदीसमवेत अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘फुकरे 3’ या चित्रपटाशी स्पर्धा करावी लागणार आहे. दोन्ही चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होणार आहेत. विवेक अग्निहोत्री यांचा यापूर्वीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत यशस्वी ठरला होता. यामुळे वॅक्सीन वॉर या चित्रपटाबद्दलही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.









