साऊथ झोन विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
कागवाड येथे राणी चन्नम्मा विद्यापीठ सिंगल झोन आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या खेळाडूंनी यश संपादन करीत युनिर्व्हसिटी ब्ल्यू हा मानाचा किताब पटकाविला आहे.
एसएमएटी शिवानंद महाविद्यालय, कागवाड आयोजित सिंगल झोन आंतरमहाविद्यालयीन शटल बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या बॅडमिंटन संघटनेच्या खेळाडूंनी नम्रता पाटील, रेहा मंथेरो, वैष्णवी वेर्लेकर, फुलराम चौधरी व हेलिक्स यांची युनिर्व्हसिटी ब्ल्यू किताबासाठी निवड होऊन आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महिला गटात उपांत्य फेरीच्या सामन्यात एसपीएम फिजिकल एज्युकेशन रायबागने बीएलडी महाविद्यालय जमखंडीचा 2-0 असा पराभव करुन अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात रायबाग संघाने केएलई लिंगराज महाविद्यालयाचा 2-0 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. पुरूष गटात केएलई लिंगराजने केएलई महालिंगपूरचा 2-0 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात लिंगराजने लक्ष्मणराव जारकीहोळी महाविद्यालय गोकाकचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. महिला गटात राणी चन्नम्मा विद्यापीठ महिलांच्या संघात नम्रता पाटील, रेहा मंथेरो व वैष्णवी वेर्लेकर तर पुरूष गटात फुलराम चौधरी व हेलिक्स यांचा साऊथ झोन इंटरयुनिर्व्हसिटी बॅडमिंटन स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. या सर्व बॅडमिंटनपटूंना एनआयएस बॅडमिंटन प्रशिक्षक भूषण अणवेकर तर संघटनेचे सचिव अशोक पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









