भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी
संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो युवा रन चे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले होते. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांनी यशस्वीरित्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नशामुक्तीचा संदेश देणारी ही मॅरेथॉन होती. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले, राजू राऊळ,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदिप मेस्त्री,वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष,राजन गिरप, सिद्धेश चिंचळकर,संतोष पुजारे, तन्मय वालावालकर, सर्वेश दळवी,सागर राणे , रवींद्र माडगावकर,, संतोष राऊळ,हितेन नाईक,निलेश पास्ते ,सिध्देश कांबळी, प्रणव वायंगणकर तसेच भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.









