बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित धरती जिओ फॅब चषक 10 वर्षाखालील आंतर क्लब फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यातून नम्म बेंगळूर संघाने सरस गुणाच्या आधारे विजेतेपद पटकाविले. एमएसडीएफ संघाने उपविजेतेपद, मॅजिक स्पोर्टिंगने तृतीय क्रमांक तर दर्शन युनायटेडने चतुर्थ क्रमांक पटकाविला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रयश डीयुएफसी याला खास गौरविण्यात आले. वडगाव येथील सीआर सेवन स्पोर्ट्स एरिना टर्फ फुटबॉल मैदानावरती झालेल्या दहा वर्षाखालील वयोगटातील फुटबॉल स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यातून मॅजिक स्पोटिंग ब संघाने एमएसडीएफ बी संघाचा 2-0 असा पराभव केला या सामन्यातील मॅजिक स्पोर्टिंगतर्फे अर्णव व सात्वकि यांनी गोल केले.दुसऱ्या सामन्यात मॅजिक स्पोर्टिंग अ संघाने बीटा स्पोर्ट्स क्लबचा 4-0 असा पराभव केला. मॅजिक स्पोर्टिंगतर्फे ट्रॅव्हीसो, शिवम, अनिकेत, जिया यांनी प्रत्येकी एक गोल केला.
तिसऱ्या सामन्यात मॅजिक स्पोर्टिंग संघाने डीयुएफसी त्याचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात ट्रॅव्हीसो व अंकित यांनी गोल केले. चौथ्या सामन्यात मॅजिक स्पोर्टिंग ब संघाने बिटा संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. मॅजिकतर्फे जीनाद एकमेव गोल केला. शेवटच्या सत्रातील सामन्यात एमएसडीएफ संघाने नम्म बेंगळूरला गोल शून्य बरोबरीत रोखले. या साखळी स्पर्धेत नम्म बेंगळूर संघाने सरस गुणाच्या आधारे विजेतेपद पटकावले. एमएसडीएफला दुसऱ्या क्रमांकावर , मॅजिक स्पोटिंग संघाला तिसऱ्या क्रमांकावर तर दर्शन युनायटेडला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे अमरदीप पाटील, विजय रेडेकर, ओमकार कुंडेकर, शुभम यादव, यश सुतार, रजत खर्डेकर, विवेक सनदी यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट प्रशिक्षक- विशाल कामु एमएसडीएफ, उत्कृष्ट गोल रक्षक विहान- बेंगळूर उत्कृष्ट डिफेंडर- सात्वीक मॅजिक स्पोर्टिंग, उत्कृष्ट मिडफिल्डर- अलोक बेंगळूर, उत्कृष्ट फॉरवर्ड शशांक एमएसडीएफ, सर्वाधिक गोल वरून एमएसडीएफ, उत्कृष्ट खेळाडू प्रयेश डी युफसी यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.









