महाबळेश्वर / प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटन स्थळांना असलेली ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे बदलून देशातील महान क्रांतिकारकांची नावे देण्यात यावी, अशी मागणी भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी केली आहे. त्याबाबतचे पत्र हे महाबळेश्वर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे झाली, तरीही काही प्रश्न अजून मार्गी लागलेले नाहीत. जसं की ब्रिटिश अधिकाऱ्यांचीच नावे महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटन स्थळांना आहेत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले त्यांची नावे आधीच लागायला पाहिजे होती. यंदाचे साल हे स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्ष आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांना क्रांतीकारकांची नावे देण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
हेही वाचा : मावस सासूच्या गळ्यातील सोन्याने केला घात, विसापूर (ता. खटाव) येथील दाम्पत्य खून प्रकरण









