ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यातील राजकीय घडामोडी पाहिल्या असता आज सकाळपासूनच बैठकांचं सत्र सुरू आहे. सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसची बैठक झाली. त्यादरम्यान शिवसेनेचे (Shivsena) नेते उपस्थित नव्हते. त्यानंतर मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बैठक घेतली. त्यामुळे आजच्या बैठकीत महाविकास आघाडी एकत्र चर्चा करताना दिसली नाही. मात्र, आता थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. या बैठकीत पुणे शहराचं नाव जिजाऊ नगर करावं अशी मागणी काँग्रेसने मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरु आहे. याबैठकीत काँग्रेसने पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा. तसेच मुंबई विमानतळाचे नामकरण करा, त्याला दि.बा.पाटलांचं नाव द्या अशी मागणी काँग्रेसने मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे.








