मोरजी ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी : पारंपारिक पायवाटा मोकळय़ा करावयात,विविध ठराव मंजूर

प्रतिनिधी /मोरजी
गोव्याचे भाग्यविधाते आणि मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे पेडणे तालुक्मयातील तेराव्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाला नाव द्यावे, असा ठराव निवृत्ती शिरोडकर यांनी मोरजी ग्रामसभेत मांडून तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
मोरजी पंचायतीची ग्रामसभा काल रविवारी सरपंच सुरेखा अमित शेटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसरपंच पवन मोर्जे, पंच रजनी शिरोडकर, पंच सुप्रिया पोके, पंच मंदार पोके, पंच स्वप्नील शेटगावकर, पंच फटु शेटगावकर, पंच विलास मोरजे ,पंच मुकेश गडेकर, पंचायत सचिव आदी उपस्थित होते.
सुरुवातीला सरपंच सुरेखा अमित शेटगावकर यांनी स्वागत केले .तर पंचायत सचिव यांनी मागच्या सभेचा इतिवृत्ता?त वाचून कायम करण्यात आला. भाऊसाहेबांचे नाव देण्याच्या ठरावावर चर्चा करताना रामनाथ पवार अनंत शेटगावकर,संतोष शेटगावकर, तुकाराम शेटगावकर, श्री मोरजकर ,आदींनी चर्चा करून मोपा विमानतळासाठी गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांचं नाव योग्य असून ते लवकरात लवकर द्यावे त्यासाठी संमती दिली.
पायवाटा मोकळय़ा करा
मोरजी पंचायत क्षेत्रात पूर्वी मोठय़ा प्रमाणात देवदेवतांच्या कार्यासाठी किंवा समुद्रकिनारी भागात जाण्यासाठी श्री मोरजाई देवीची पालखी पारंपरिक वाट गावात बकरा उत्सव करण्यासाठी पारंपारिक वाट आणि अनेक अशा ज्या पारंपारिक पायवाट आहेत आणि त्या पायवाटा अडून त्या ठिकाणी रस्ते बांधकामे केलेली आहेत, त्या सर्व पायवाटा मोकळय़ा कराव्यात, अशी मागणी या ग्रामसभेत करण्यात आली. यावेळी उपसरपंच पवन मोरजे यांनी यावर योग्य तो निर्णय घेऊन गावातील ग्रामस्था?ना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली.
तुकाराम शेटगावकर यांनी यावेळी डोंगर मारानावर बेकायदा रस्ता केला जात आहे, बांधकामे केली जात आहे. अशा बांधकामा विरोधात तक्रार करूनही पंचायत आज पर्यंत का कारवाई करत नाही. असा सवाल करून जो सार्वजनिक रस्ता आहे त्या रस्त्याच्या मधोमध डोंगर माळरानावर गेट घालून जनतेला अडवले जाते। त्यावरही कारवाई करावी अशी मागणी करणारा ठराव तुकाराम शेटगावकर यांनी मांडला. शिवाय रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून जी दुकाने थाटली जातात. त्यांची वाहने कुठे पार्क केली जातात . जाहिरात फलक लावून अतिक्रमण केले जाते. शिवाय पाण्याचा प्रश्न वीज समस्या गार्बेज रस्त्यावर ओहोळामध्ये फेकली जाते त्यांच्यावर कारवाई करणार ठराव तुकाराम शेटगावकर यांनी मांडला या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
न्यूववाडा भागात ओहोळावर बांधकाम करून रस्ता केला, त्यामुळे पाणी पूर्ण मुख्य रस्त्यावर साचते. शिवाय ज्यांची हॉटेल्स आहेत बिगर गोमंतक यांची त्यांना त्यांच्या ग्राहकांसाठी कसल्याच प्रकारची पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे ती वाहने रस्त्यावर पाक करून वाहतूक कोंडी केली जाते, त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी गजानन शेटगावकर यांनी केली.
मोरजे पंचायत क्षेत्रात कुठल्याही पारंपारिक मच्छिमार व्यावसायिकांनी आम्हाला व्यावसायिक जीटी उभारावी अशी मागणी केली नाही परंतु सरकारने छुप्या मार्गाने व्यावसायिक जेटी उभारण्याचा जो डाव आखलेला आहे. तो हाणून पाडावा शिवाय या व्यावसायिक जेटीला मच्छीमार बांधवांचा पूर्णविरोध आहे तसा ठराव मंजूर करावा अशी मागणी अमित मोरजे यांनी यावेळी केली. शिवाय मोरजी किनारा हा संवेदनशील किनारा असूनही तो व्यावसायिक झोन का जाहीर करण्यात आला. आणि असे केल्यामुळे स्थानिकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे व्यावसायिक जेटी आणि सायलेंट झोन याला विरोध असल्याचे अमित मोर्जे यांनी सांगितले.
दीपक शेटगावकर यांनी यावेळी ठराव मांडताना सांगितले की गावात जे व्यावसायिक दुकान, घरे भाडय़ाने देतात किंवा गेस्ट हाऊस आहेत अशा व्यावसायिकाकडून किती प्रकारचा महसूल पंचायतीला मिळत आहे. आणि जर मिळत नाही तर त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई केली जाते सर्व व्यवसायाकडून पंचायतीने महसूल गोळा करावा मागच्या ग्रामसभेत अशा प्रकारचा ठराव मांडूनही तशी कार्यवाही समाधानकारक झाली नसल्याने दीपक शेटगावकर यांनी खंत व्यक्त केली.
सोनू शेटगावकर, सुभाष शेटगावकर आप्पा शेटगावकर संतोष शेटगावकर, रामनाथ पवार, अनंत शेटगावकर आदींनी वेगवेगळय़ा समस्या या ग्रामसभेत मांडल्या. मयूर शेटगावकर यांनी प्रशासकीय अधिकाऱयाने फार्म हाऊसला कशा पद्धतीची परवानगी दिली असा सवाल केला असता सरपंच आणि पंचमंडळींना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. गौतम शेटगावकर यांनी सरकारी योजना किंवा ज्या गरिबांसाठी योजना आहेत त्या गरिबांच्या योजना गरीबापर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत का प्रयत्न करत नाही. असा सवाल केला किंवा स्वयं मित्र त्यासंबंधी माहिती देतो की नाही याविषयी स्पष्टीकरण पंचायतीने द्यावे अशी मागणी केली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून विविध समित्या निवडण्यात आल्या.









