Na.Dho.Mahanor Passed Away : जेष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर यांच निधन झालंय. वयाच्या 81 व्या वर्षी पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने साहित्यविश्व शोकाकूल झाले आहे. अनेक दिवसापासून किडणीच्या आजाराने ते त्रस्त होते.त्यांच्या पश्चात दोन मुले व तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांनी “जगला प्रेम अर्पावे”, “गंगा वाहू दे निर्मळ” आणि “दिवेलागणीची वेळ” यासह अनेक लोकप्रिय कविता आणि गाणी लिहिली.याचबरोबर “एक होता विदुषक”, “जैत रे जैत”, “सर्जा” सारख्या मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली.रानातल्या कविता, अजिंठा, पानझड, पावसाळी कविता, पळसखेडची गाणी हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह होते. “मी रात टाकली, मी कात टाकली”,”ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे” या गीताची रचना त्यांनी केली.
ना.धों. महानोर यांचा अल्पपरिचय
1942 मध्ये जन्मलेल्या नामदेव धोंडो महानोर यांना 1991 ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1978 ला ते राज्य विधानपरिषदेचे सदस्यही होते. 1985 ला महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित, पानझड या कवितासंग्रहाला 2000 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.2004 ला शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल कृषिरत्न सुवर्णपदक, 2004 ला डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार, 2009 साली कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, 2012 विं. दा. करंदीकर जावनगौरव पुरस्कार(महाराष्ट्र सरकार),2015 ला गीतकार जीवन गौरव पुरस्कार,2017 ला मराठवाडी भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.








