आरएमआर शटल बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात
बेळगाव : आरएमआर स्पोर्ट्स अकादमी आयोजित तसेच अमोदराज स्पोर्ट्स प्रायोजित राशी चषक बॅडमिंटन स्पर्धेत हार्दिंन, मायरा, यशीस, अनिका, नमन, अभिलाशा, आश्ता, माहीम, गिहीना, सिया, आदिती यांनी शानदार कामगिरी केली. आरएमआर स्पोर्ट्स अकादमीमध्ये ही स्पर्धा झाली. स्पर्धेत एकूण 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे निकाल-उपांत्य फेरी 11 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत शवनक केतकरने आराध्य के.चा 15-8, 15-10, हार्दीन बंगने तनिष्क हंबरचा 15-7, 15-6 असा पराभव केला. अतिम सामन्यात हार्दीन बंगने शवनक केतकरचा 15-13 15-10 तसेच मुलींच्या एकेरीच्या उपांत्य सामन्यात मायरा हरगुडेने मायरा के. चा 15-4, 15-4 ने पराभव केला. ऊशिकाने देविशाचा 15-। 15-12 असा पराभव करत अंतिम सामन्यात मायरा हरगुडेने ऊशिका रेवणकर हिचा 15-3, 15-13 असा पराभव करत विजेतेपद मिळविले.
13 वर्षाखालील मुलांच्या एकेरीच्या उपांत्य लढतीत यशने ईशानचा 15-12, 15-14 तर शौनकने सोनित जी.चा 15-12, 15-8 असे पराभूत केले. अंतिम फेरीत यशस सी.ने शौनक के.चा 15-12, 15-14 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या एकेरीतील उपांत्य फेरीच्या सामन्यात अनिका नायकने सान्वी डी.चा 15-12, 15-8 तर आराध्या कणगुटकरने अन्वीता उप्पीनचा 15-12, 8-15, 15-13 असे हरवले. अंतिम सामन्यात अनिका नायकने आराध्या कणगुटकरचा 15-10, 15-6 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. 15 वर्षांखालील मुलांच्या एकेरीतील उपांत्य सामन्यात नमन हसबेने अनिशवर 15-4, 15-5 तर अभिलाषने विराजवर 15-8, 15-11 अशी मात केली. अंतिम सामन्यात नमन हसबेने अभिलाष असुंडीचा 15-8 15-1 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. 15 वर्षाखालील मुलींच्या एकेरीतील उपांत्य लढतीत अरुणा असुंडीने आकांक्षाचा 15-7, 15-8 तर आस्था एच.ने अनिका नायकचा 15-5, 15-3 असा पराभव केला.
17 वर्षाखालील मुलांच्या एकेरीची उपांत्य सामन्यात नमन हसबेने अभिलाषचा 15-8, 15-13, 15-10 असा तर माहीम जी.ने नमन अणवेकरचा 15-12, 15-7 असा पराभव केला. अंतिम सामन्यात माहीम जी.ने नमन हसबेचा 15-10, 15-7 असा पराभव करत विजेतेपद मिळविले. 17 वर्षाखालील मुलींच्या एकेरीच्या उपांत्य लढतीत सेयाने सान्वी डी.चा 15-12, 15-8 तर गेहेन्नाने तीर्थाचा 15-12, 15-13 असा पराभव केला. 19 वर्षांखालील मुलांच्या एकेरीची उपांत्य लढतीत प्रथमने संकल्पचा 15-12, 15-13 तर नमन अणवेकरने ओम बबलाडीचा 15-10, 15-12 पराभव केला. अंतिम सामन्यात नमन अणवेकरने प्रथम रायकरचा 15-7, 15-9 असा पराभव करत विजेतेपद मिळविले. 19 वर्षांखालील मुलींच्या एकेरीची उपांत्य फेरीत सेयाने तन्वीला 15-7, 15-12 तर श्रीनिधीने खुशीला 15-8, 15-9 असे पराभूत केले. पुऊषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अथर्व हुबळीकरने दिनेशचा 15-7, 15-10 तर माहीम जी.ने ध्रुवचा 6-15, 15-9, 15-6, असा पराभव केला.
अंतिम सामन्यात माहीम जी.ने अथर्व हुबळीकरचा 15-8, 15-13 पराभव करत जेतेपद मिळविले. महिलांच्या विभागातील उपांत्य फेरीच्या सामन्यात आदिती आसुंडीने तनिषाचा 15-5, 15-3 तसेच सियाने साचीचा 15-10, 15-12 पराभव केला. अंतिम फेरीत आदिती आसुंडीने सिया मेहताचा 15-10, 15-12 असा पराभव करत जेतेपद मिळविले. पुऊष दुहेरीमध्ये अथर्व एच.-आदित्य या जोडीने ध्रुव-वर्धमान जोडीचा 15-8, 15-12 तर ओम यलिगार-अजिंक्मय जोशी या जोडीने प्रथम-ओम जोडीचा 15-13, 15-8 असा पराभव केला. अथर्व हुबळीकर-आदित्य, यांनी बीट्स ओम यलिगार-अजिंक्मय जोशी यांचा 15-10, 8-15, 15-13 तसेच महिला दुहेरीत नम्रता-रिया एम. जोडीने सिया-साची जोडीचा 15-8, 10-15, 15-12 असा पराभव केला.
अदिती आसुंडी-अरुणा आसुंडी जोडीने आस्था-घेना जोडीचा 15-8, 15-12 तसेच अदिती आसुंडी/अरुणा असुंडी यांनी नम्रता-रिया एम.चा 15-13, 15-10 असा पराभव केला. पुऊष दुहेरीत विनोद-नरसिंह यांनी मंजुनाथ-गौरव यांचा 15-8, 15-12 असा, विनायक असुंडी-अजय असुंडी यांनी प्रदीप-प्रेम यांचा 15-8, 15-12 असा पराभव केला. अंमित सान्यात विनायक असुंडी-अजय असुंडी यांनी विनोद- नरसिंह यांचा 15-8, 15-8 असा पराभव करत विजेतेपद मिळविले. बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे उमा शेट्टी, हरी शेट्टी, आनंद हावण्णवर, अशोक पाटील, मोहनदास रायकर, शैलजा भिंगे, प्रमुख पंच भूषण अन्वेकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे देवून गौरविण्यात आले.









