बेंगळूर :
फिनटेक क्षेत्रातील फर्म भारत पेच्या सीईओपदी नलीन नेगी यांना बढती मिळाली आहे. यापूर्वी ते या कंपनीत अंतरिम सीईओ म्हणून कार्यरत होते. भारत पे संचालक मंडळाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी त्यांची घोषणा केली आहे.
नलीन नेगी हे 2022 मध्ये सीएफओ म्हणून कंपनीत रुजू झाले होते. मागच्या वर्षी जानेवारीत त्यांना अंतरिम सीईओपदी नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळेला त्या पदावर सोहेल समीर हे होते. ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हे पद रिकामे राहिले होते. आगामी काळामध्ये भारत पेच्या विकासासाठी नलीन नेगी यांचे प्रयत्न फळाला येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. लवकरच नव्या सीएफओपदी उमेदवार निवडला जाणार असल्याचेही रजनीश कुमार यांनी म्हटले आहे.









