नवी दिल्ली
नॅशनल ऍल्युमिनियम कंपनी लिमिटेडचा (नाल्को) 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱया तिमाहीत एकत्रित नफा 83.2 टक्क्यांनी घसरून 125.43 कोटी रुपयांवर आला आहे. या संदर्भात कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली आणि सांगितले की जास्त खर्च आणि कमी उत्पन्न यामुळे नफ्यावर परिणाम होऊन तो कमी झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत नाल्कोने 747.80 कोटी रुपयांचा एकत्रित नफा कमावला होता. याच कालावधीत, कंपनीचे एकत्रित उत्पन्न 3,558.83 कोटी रुपयांवर घसरले, जे मागील वर्षी याच कालावधीत 3,634.5 कोटी रुपये राहिल्याची नोंद करण्यात आली होती.









