महिलेच्या नावावर विश्वविक्रम
जगभरात लोकांदरम्यान विविध प्रकारचे विश्वविक्रम प्रस्थापित करण्यावरून क्रेझ राहिली आहे. अशाच प्रकारचा विश्वविक्रम अमेरिकेतील एका महिलेने केला आहे. डायना आर्मस्ट्राँग नावाच्या या महिलेने सर्वात लांब नखं ठेवण्याचा विक्रम नोंदविला आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने यासंबंधी घोषणा केली आहे.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनुसार अमेरिकेच्या मिनिसोटा येथे राहणाऱया डायनाच्या नावावर दोन्ही हातांमध्ये सर्वात लांब नखं ठेवण्याचा विश्वविक्रम नोंद आहे. डायना आर्मस्ट्राँग यांच्या दोन्ही हातांच्या नखांची लांबी सुमारे 42 फूट इतकी झाली आहे. या महिलेने मागील 25 वर्षांपासून स्वतःची नखं कापलेली नाहीत.

डायना यांचे वय सुमारे 63 वर्षे आहे. या महिलेने सर्वात लांब नखं बाळगण्याचा विक्रम मार्च महिन्यात नेंदविला आहे. मागील 25 वर्षांपासून त्या नखं वाढवत आहेत. डायना यांनी अखेरच्या वेळी 1997 मध्ये नखं कापली होती. तिच्या नखांची एकूण लांबी ही सामान्य बसपेक्षाही अधिक असल्याचा दावा आहे.
मुलीच्या आठवणीत…
डायना यांच्या नखं न कापण्याच्या निर्णयामागे एक दुःखद कहाणी आहे. डायना यांच्या 16 वर्षीय मुलीचा अस्थमामुळे मृत्यू झाला होता. त्यांची मुलगी दर आठवडय़ाला नखं कापली होती. डायना यांनी स्वतःच्या मुलीच्या आठवणीकरता 25 वर्षांपासून नखं कापलेली नाहीत. आता त्यांचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे.









