प्रसाद बाचीकर उपविजेता :राजकुमार दोरगुडे उत्कृष्ट पोझर
बेळगाव : शिवमोगा येथे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व शिवमोगा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय युवा दसरा श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या नागेंद्र माडीवाळरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर युवा दसरा किताब पटकाविला. तर बेळगावच्या प्रसाद बाचीकरने पहिले उपविजेतेपद तर बेळगावच्या राजकुमार दोरगुडेने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. आयबीबीएफ मुंबईच्या नियमानुसार 55 किलो, 60, 65, 70 75, 80, 85, 85 वरील अशा आठ वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत 55 किलो गटात : 1)सचिन के. (उ.कन्नडा), 2)रोहित माळवी (बेळगाव), 3)गोविंद यादव (गदग), 4)मोहीनीश (दावणगिरी), 5)लक्ष्मण सौन्नद (बागलकोट).
60 किलो गटात : 1)बसवराज (दावणगिरी), 2)रोनॉल्ड डिसोजा (द.कन्नडा), 3)दिपक (चिक्कमंगळ्ळूर), 4)उदय मुरकुंबी (बेळगाव), 5)शन्मुख प्रसाद (शिमोगा).
65 किलो गटात : 1)संतोष नाईक (दावणगिरी), 2)सोमशेखर कारवी (उडूपी), 3)मंजुनाथ सोंटक्की (बेळगाव), 4)बसवाणी गुरव (बेळगाव), 5)किरण रायचूर (धारवाड)
70 किलो गटात : 1)आदित्य काटकर (बेळगाव), 2)सुनिल भातकांडे (बेळगाव), 3)श्रवणन एच. (बेंगळूर), 4)अभिलाश (उडूपी), 5)नवीन बी. (धारवाड).
75 किलो गटात : 1)नागेंद्र मडिवाळ (बेळगाव), 2)प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), 3)रवीकुमार एस. (बेंगळूर), 4)श्रीनिधी ए. जे. (हासन), 5)रजत (उ. कन्नडा).
80 किलो गटात : 1)प्रसाद बाचीकर (बेळगाव), 2)गिरीश मायगेरी (सेंट्रल रेल्वे), 3)कृष्णा बी. (धारवाड), 4)आजर (शिवमोगा), 5)राजेश (उडपी).
85 किलो गटात : 1)महेश गवळी (बेळगाव), 2)सत्यनारायण आर. टी. (रेल्वे), 3)क्लिंटन (द. कन्नडा), 4)विजयकुमार (बेंगळूर), 5)विनीत हणमशेट (बेळगाव)
85 वरील किलो गटात : 1)गुरूप्रसाद (उडपी), 2)जहरसिंग (उडपी), 3)सागर एच. एस. (उडपी), 4)रवीकुमार (शिमोगा). यांनी विजेतेपद पटकाविले. त्यानंतर युवा दसरा श्री किताबासाठी सचिन के, बसवराज, संतोष नाईक, आदित्य काटकर, नागेंद्र माडीवाळ, प्रसाद बाचीकर, महेश गवळी, गुरूप्रसाद यांच्यात लढत झाली. त्यामध्ये नागेंद्र माडीवाळ, प्रसाद बाचीकर, गुरूप्रसाद यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये नागेंद्र मडीवाळने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर युवा दसरा हा मानाचा किताब पटकाविला. तर बेळगावच्या प्रसाद बाचीकरने पहिले उपविजेतेपद पटकाविले. बेळगावच्या राजकुमार दोरगुडेने उत्कृष्ट पोझींगद्वारे उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला. मान्यवरांच्याहस्ते विजेत्या नागेंद्र माडीवाळ, उपविजेत्या प्रसाद बाचीकर यांना मानाचा किताब, आकर्षक चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे उत्कृष्ट पोझर राजकुमार दोरगुडेला चषक व प्रमाण व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून गंगाधर एम., सुनिल राऊत, आनंद लंगरकांडे, सुनील पवार यांनी काम पाहिले.









