वाल्मिकी कुस्ती मैदान संघटनेतर्फे आयोजन
बेळगाव : महर्षी वाल्मिकी कुस्तीगार संघटना आयोजित वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन रविवार दि. 29 रोजी अलतगा खडी मशिन शेजारच्या मैदानावर आयोजत करण्यात आली आहे. या मेदानात प्रमुख कुस्ती कर्नाटक केसरी नागराज बशिडोनी व हरियाणा चॅम्पियन मनिषकुमार यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती किर्तीकुमार (पुणे) व शांताराम (सांगली), तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती शुभम भोसेकर (पुणे) व प्रेम जाधव (कंग्राळी), चौथ्या क्रमांकाची कुस्ती किरण अष्टगी (कलखांब) व विशाल (इचलकरंजी), पाचव्या क्रमांकाची कुस्ती गिरिश (चिक्कबागेवाडी) व पृथ्वी पाटील (कंग्राळी), सहाव्या क्रमांकाची कुस्ती गजानन (सांगली) व हर्षद दाणवे (इचलकरंजी), सातव्या क्रमांकाची कुस्ती राजू डागेकर (शिनोळी) व महादेव दरेण्णावर (भांदूर गल्ली) आठव्या क्रमांकाची कुस्ती निरंजन (येळ्ळूर) व शुभम (कंग्राळी), नवव्या क्रमांकाची कुस्ती प्रविण (निलजी) व अमर (बंबरगा), दहाव्या क्रमांकाची कुस्ती कार्तिक (निट्टूर) व सुरज (कडोली) यांच्यात होणार आहे. याशिवाय 50 हून अधिक लहान-मोठ्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मेंढ्याच्या बक्षीसाची कुस्ती अजित चौगुले व ओमकार (राशिवडे) यांच्यात होणार आहे. या मेदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून कुस्त्या यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.









