Nagpur Winter Session Of Maharashtra Assembly : कोरोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे.अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. ‘५० खोके एकदम ओके’ असे फलक घेऊन विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. या अधिवेशनात महापुरुषांचा अपमान आणि सीमावादासह अनेक मुद्द्यायावर चर्चा झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्यानंतर गदारोळ झाला. यामुळे विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पुत्राचे ‘ब्रॅण्डिंग’
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर शहरात सर्वत्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे फलक लावण्यात आले असून त्यात मोठ्या प्रमाणात एकनथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याही फलकांचा समावेश आहे. विमानतळापासून तर विधानभवनापर्यंत जाणाऱ्या सर्वच प्रमुख मार्गावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह भाजप नेत्यांचेही मोठे फलक, कटाऊट्स लावण्यात आले आहेत.अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री पुत्राचे ‘ब्रॅण्डिंग’ केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विधिमंडळात शाई पेनावर प्रतिबंध
पुणे येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर घडलेल्या शाई फेक प्रकरणानंतर विधिमंडळातही शाई पेनावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. आज पहिल्या दिवशी विधिमंळात येणाऱ्या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले.यावेळी शाईचे पेन नेण्यास बंदी घालण्यात आली.
Previous Articleबेळगाव सीमावादावर विधानसभेत अजित पवारांनी विचारला सरकारला प्रश्न
Next Article आज विधिमंडळ अधिवेशनात काय घडले ..?









