ऑनलाईन टीम / तरुण भारत :
औरंगाबाद ते पुणे हा नवा महामार्ग आम्ही बनवणार आहोत. लवकरच या कामाला सुरूवात होईल. त्यामुळे नागपूर ते पुणे हा 17 तासांचा प्रवास अवघ्या 6 तासात करता येईल, असा विश्वास केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
नागपूरमध्ये एम्सचं उद्घाटनं पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं. या सोहळ्यात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात आम्ही नवीन सहा महामार्ग बनवणार आहोत. यामध्ये सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-बेंगळूर-त्रिवेंद्रम-चेन्नई-हैदराबाद असा एक साऊथमध्ये जाणारा मार्ग असणार आहे. तसेच इंदौर-हैदराबाद, हैदराबाद-रायपूर, नागपूर-विजयवाडा, पुणे-बेंगळूर, पुणे-औरंगाबाद हे 75,000 कोटी रुपयांचे महामार्ग आम्ही पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली तयार होणार आहेत.
अधिक वाचा : चंद्रकांत पाटील शाईफेकप्रकरणी 11 पोलीस निलंबित
यामधील औरंगाबाद ते पुणे या नव्या महामार्गामुळे नागपूर ते पुणे हा 17 तासांचा प्रवास अवघ्या 6 तासात पूर्ण होऊ शकेल, असेही गडकरी म्हणाले.