कोरोनामुळे गेली दोन वर्ष कोणतेच सण-समारंभ साजरे झाले नाहीत. यंदा मात्र मोठ्या उत्साहात सर्वच सण साजरे होणार आहेत. आज नागपंचमीचा सण आहे. त्यातच शिराळ्याला एेतिहासिक पार्श्वभूमी आहे. जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा येथे अनेक वर्षापासून आहे. शिराळ्याच्या ऐतिहासिक अशा नागपंचमीला परवानगी द्या आणि नागाला वन्यजीव प्राण्यांच्या यादीतून वगळा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी नुकतीच संसदेत केली होती. मात्र अजून न्यायालयाने य़ा संदर्भात तसा कोणताच आदेश दिलेला नाही. म्हणूनच न्यायालयाच्या आदेशानुसारच यंदा शिराळात नागपंचमी साजरी केली गेली.
याबाबत सुब्रमण्यम समितीने भारतीय सण, उत्सव, परंपरा यांच्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे सुचवलं आहे, असे माने यांनी म्हंटले असलं, तरी जिवंत नागाची पूजा करावी असा निर्णय अजून दिला गेलेला नाही.त्यामुळे यंदाही न्यायालयाचे आदेश पाळूनच शिराळाकरांनी नागपंचमी साजरी केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








