वार्ताहर /किणये
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विठ्ठल रखुमाई मंदिर, किणये यांच्यावतीने खास दीपावलीनिमित्त खुल्या गटासाठी एका माणसाने रिकामी बैलगाडी ओढण्याची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीमध्ये देवलापूर येथील नागेश नायक यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर हन्नीकेरी येथील सिद्धेश्वर प्रसन्न यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. शनिवार व रविवार असे दोन दिवस ही शर्यत उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य मारुती डुकरे तर उद्घाटक म्हणून हेमंत पाटील होते. प्रास्ताविक विजय डुकरे यांनी केले.
यावेळी गावातील विविध मान्यवर व ग्रामपंचायत सदस्यांतर्फे विविध देवदेवतांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी गावातील पंचकमिटी उपस्थित होती. मंडळाचे अध्यक्ष रामलिंग डुकरे, उपाध्यक्ष धाकलू डुकरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शर्यतीत तिसरा क्रमांक रवळनाथ-कलमेश्वर प्रसन्न वाघवडे यांनी मिळवला. चौथा चव्हाटा प्रसन्न कणबर्गी, पाचवा बसवेश्वर प्रसन्न संतिबस्तवाड, सहावा वडगाव येथील मंगाईदेवी प्रसन्न, सातवा माऊली प्रसन्न बेटगिरी, आठवा सिद्धेश्वर प्रसन्न कणबर्गी, नववा मंडोळी ज्योतिर्लिंग प्रसन्न, दहावा हालगा येथील गजानन प्रसन्न यांनी मिळविला. तसेच 21 वा लकी नंबर पवन विलास पाटील यांनी मिळविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली. सूत्रसंचालन पुंडलिक दळवी यांनी केले. संतोष पाटील व दयानंद डुकरे यांनी आभार मानले.









