नागरिकांचा जाहीर पाठिंबा : प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार
वार्ताहर /हिंडलगा
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. मंडोळी, सावगाव, हंगरगे आदी गावांमध्ये मनोळकर यांच्या प्रचारासाठी भव्य पदयात्रा काढून बेळगाव ग्रामीणच्या सर्वांगीण विकासासाठी मनोळकर यांनाच विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. याला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनोळकरांनाच प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजप उमेदवार नागेश मनोळकर यांनी अखेरच्या टप्प्यात प्रत्येक गावामध्ये जोरदार प्रचारावर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने देशभरात विविध विकासकामे राबवून गोरगरीब जनतेच्या सुधारणांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. विविध उद्योगधंद्याची निर्मिती करून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे 10रोजी होणाऱ्या निवडणुकीत कोणाच्याही आमिषाला बळी न पडता भाजपच्या उमेदवारांनाच विजयी करा, असे आवाहन मतदारांना केले.









