Nagesh Dalvi’s success in Agniveer!
सावंतवाडीच्या महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी नागेश दळवी यांनी वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर ए .आर .ओ .ची अग्नीवीर भरती मधील ग्राउंड व लेखी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले आहे . त्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. नागेश सारख्या होतकरू विद्यार्थ्यांने स्वतःच्या प्रामाणिक कष्टाच्या जोरावर आज यशाला गवसणी घातलीय . कठीण परिस्थितीतही मेहनत करत जिद्दीने त्याने ही परीक्षा दिली आणि यश मिळवलं . त्याच्या पुढील वाटचालीस महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडी / प्रतिनिधी









