प्रतिनिधी/ बेळगाव
कलाश्री लकी ड्रॉचीं नववी बंपर सोडत शनिवार 20 ऑगस्ट रोजी कलाश्री टॉवर येथे डॉ. रवि पाटील बेळगांव यांचे हस्ते काढण्यात आली. मजगाव येथील नागेंद्र मजुकर हे बंपर बक्षिस 300 लिटर सोलार वॉटर हिटरचे विजेते ठरले. उद्यमबाग येथील कलाश्री कार्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी व्यासपीठावर इस्कॉन बेळगाव सदस्य कल्लाप्पा तरळे, बेळगांव ऑटो असोसिएशन ओनर संजय चतुर, उद्यमबाग येथील एसबीआय बँकेचे व्यवस्थापक स्मरनिका दास, विजय मरकुटे, कलाश्रीचे संचालक प्रकाश डोळेकर उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलीप करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कलाश्री ग्रुपतर्फे मान्यवरांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. टी. डी. पाटील, गोपाळ महाराज हलगा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मुक्ताताई नावले, वैजू गावडे, प्रकाश बेळवटकर, प्रितम नडवीनहळ्ळी, अक्षता जाधव यांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कल्लाप्पा तरळे यांनी आपले विचार मांडले. यावेळी कलश्रीचे सभासद, ग्राहक, कर्मचारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. डा.r पाटील व श्रीधर पाटील यांनी केले. कलाश्रीच्या संचालिका सुकन्या डोळेकर यांनी आभार मांडले.









