रितीक पाटील उपविजेता, गोकाकचा सागर कळीमण्णी उत्कृष्ट पोझर
क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
बेळगाव डिस्ट्रिक बॉडीबिल्डिंग असोसिएशन व स्पोर्ट्स संघटना आयोजित मि. बेळगाव जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत रुद्रजीमच्या नागेंद्र मडिवाळ याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. बेळगाव हा किताब पटकाविला. रुद्रजीमच्या रितीक पाटीलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गोकाकच्या सागर कळ्ळीमनीने उकृष्ठ पोझरचा बहुमान मिळविला.
महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे झालेल्या स्पर्धेत आयबीबीएफच्या नियमानुसार सात वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. निकाल पुढील प्रमाणे…
55 किलो गट- 1) रौनक गवस-चॅम्पियन, 2) सागर कळ्ळीमनी-कार्पोरेशन-गोकाक, 3) सुनील जी.-रौ फिटनेस, 4) नूरानी गट्टीगिरी-स्वेअर जीम, 5) अमर सांगलीकर-विजया-खानापूर
60 किलो गट- 1) उमेश गंगणे-एस.एस.फौंडेशन, 2) व्ही. के. सागर-फिटनेस-खानापूर, 3) आदर्श के.-बी.स्ट्राँग, 4) श्रीधर एच.-बाल हनुमान तालिम, 5) शुभम एम. ओम फिटनेस
65 किलो गट- 1) रितीक पाटील-रुद्र, 2) जयकुमार-रुद्र, 3) गजानन पाटील-रुद्र, 4) ओमकार पाटील-खानापूर, 5) आकाश हवलगोड-गोकाक
70 किलो गट- 1) बसाप्पा के.-रुद्र, 2) किशोर पुजारी-मंथन, 3) सय्याजी जी.-सायलेंट, 4) आदित्य एम.-नेक्स्टलेव्हल, 5) रितेश एच.-एन. एल. फिटनेस
75 किलो गट- 1) नागेंद्र मडिवाळ-रुद्र, 2) भारत टी.-स्लिम फिटनेस, 3) दिग्विजय पाटील-फ्लेक्स, 4) अनंत पाटील-रौ फिटनेस, 5) बसवाणी जी.-रुद्र
80 किलो गट- 1) महेश गवळी-रुद्र, 2) आकाश एल., 3) हर्ष बी.-रौ फिटनेस, 4) जोतिबा पाटील-रुद्र, 5) सार्थक पाटील-व्याया मंडळ-खानापूर
80 किलो वरील गट- 1) गजानन काकतीकर-एस.एस.फौंडेशन, 2) सुजित शिंदे-रुद्र, 3) संदीप एस.-रौ फिटनेस, 4) प्रतिक बाळेकुंद्री-रुद्र, 5) मलिक मुजावर-धेरो फिटनेस यांनी विजेतेपद पटकाविले.
त्यानंतर मिस्टर बेळगाव किताबासाठी रौनक, गवस, उमेश गंगणे, रितीक पाटील, बसाप्पा के., नागेंद्र मडिवाळ, महेश गवळी, गजानन काकतीकर यांच्यात लढत झाली. त्यामध्ये नागेंद्र मडिवाळ, गजानन काकतीकर, महेश गवळी व रितीक पाटील यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर रुद्र जिमच्या नागेंद्र मडिवाळने मि. बेळगाव हा मानाचा किताब पटकाविला. त्याला मान्यवरांच्या हस्ते मानाचा किताब, आकर्षक चषक, रोख 11 हजार रुपये देवून गौरविण्यात आले. तर रुद्र जिमच्या रितीक पाटीलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याला रोख 7 हजार रुपये व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले.
बेस्ट पोझर किताबासाठी झालेल्या लढतीत उमेश गंगणे व सागर कळ्ळीमनी यांच्यात तुलनात्मक लढत झाली. पण सागर कळ्ळीमनीने आपल्या उत्कृष्ठ पोझार हा किताब पटकाविला. त्याला रोख 5 हजार रुपये व चषक देवून गौरविण्यात आले. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बीडीबीए स्पोर्ट्स संघटनेचे अध्यक्ष महेश सातपुते, सचिव राजेश लोहार, राजू पवार, आनंद अकणोजी, सायबन्नावर, किशोर गवस, नारायण चौगुले, ज्यु. मि. इंडिया रणजित किल्लेकर, सुनिल चौधरी, अनिल अमरोळे, बाबु पावशे, जितेंद्र काकतीकर, विजय चौगुले, चेतन ताशिलदार, सुनिल बोकडे, भरत बाळेकुंद्री, विनोद म्हेत्री, अमित जडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ही तर अनोखी भेट
बेळगाव डिस्ट्रिक बॉडीबिल्डिंग असोसिएशन व स्पोर्ट्स संघटना आयोजित मि. बेळगाव जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत यावेळी शरीरसौष्ठवपटूंना मोफत प्रवेशसह रोख रक्कम, चषक व जीवनावश्यक वस्तु भेट दिल्याने शरीरसौष्ठवपटूंनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र देण्यात येते. पण या संघटनेने शरीरसौष्ठव पटूंना जीवनाश्यक वस्तु देवून नवीन पायंडा घातला आहे.
पहिल्या स्पर्धेत उत्स्फुर्त प्रतिसाद
बेळगाव डिस्ट्रिक बॉडीबिल्डिंग असोसिएशन व स्पोर्ट्स संघटना आयोजित मि. बेळगाव जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत 136 स्पर्धकांनी सहभाग घेतला. संघटनेला जवळपास 75 ते 80 स्पर्धक येतील, असा अंदाज होता. मात्र 125 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतल्याने संघटनेने प्रशिक्षक व खेळाडूंचे आभार व्यक्त केले. या नूतन संघटनेने सुरू केलेल्या या स्पर्धेमुळे आनंद व्यक्त होत आहे.









