वृत्तसंस्था / अबु धाबी
आगामी होणाऱ्या विश्व टेनिस लीग स्पर्धेत भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागल आपला सहभाग दर्शविणार आहे. विश्व टेनिस लीग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिसपटू सहभागी होत असतात.
पुरुष विभागात रशियाचा पाचवा मानांकित डॅनिल मेदव्हेदेव तसेच महिलांच्या विभागात अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम विजेती आर्यना साबालेंका या स्पर्धेचे आकर्षण राहिल. सदर स्पर्धा 19 ते 22 डिसेंबर दरम्यान होणार आहे. पुरुषांच्या विभागात मेदव्हेदेव, रुबलेव्ह, कास्पररुड, हुरकेज तर महिलांच्या विभागात साबालेंका, क्रेसिकोव्हा, जसमिन पावोलिनी यांचा सहभाग निश्चित असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. मात्र सुमित नागल कोणत्या संघाकडून खेळणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.









