वृत्तसंस्था/ ऑकलंड
2025 च्या टेनिस हंगामातील एटीपी टूरवरील येथे सुरु होणाऱ्या एएसबी क्लासिक पुरुषांच्या ऑकलंड टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागलने पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले आहे.
एटीपी टूरवरील या 250 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत प्रमुख ड्रॉसाठी पात्रतेचे सामने खेळविले गेले. 26 वर्षीय सुमित नागलने पात्रतेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या अॅड्रीयन मॅनेरिनोचा 7-6 (7-5), 6-3 असा पराभव करत प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले. ऑकलंडमधील ही स्पर्धा सोमवारपासून सुरु होत आहे. 12 जानेवारीपासून मेलबोर्नमध्ये ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत असून सदर ऑकलंडची स्पर्धा सरावाची म्हणून ओळखली जाते.









