दिग्दर्शक चंदू मोंडेती यांच्या चित्रपटात करणार काम
दक्षिणेतील दिग्गज अभिनेता नागा चैतन्य स्वत:च्या चित्रपटांसोबत खासगी आयुष्यावरूनही चर्चेत असतो. अभिनेत्याचे नाव आता शोभिता धुलिपालासोबत जोडले जात आहे. परंतु अद्याप दोघांनीही परस्परांना डेट करण्याची पुष्टी दिलेली नाही. याचदरम्यान नागा स्वत:च्या आगामी चित्रपटावरून चर्चेत आहे. या चित्रपटात नागा हा कीर्ति सुरेशसोबत दिसून येणार आहे. नागा चैतन्यने दिग्दर्शक चंदू मोंडेती यांच्या चित्रपटात काम करण्यास होकार दर्शविला आहे. यापूर्वी नागाने त्यांच्यासोबत दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्री कीर्ति सुरेश या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित असून यात नायक स्वत:च्या प्रेयसीसाठी मोठी जोखीम पत्करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात नागा चैतन्य हा एका नावाड्याची भूमिका साकारत आहे. नागा यापूर्वी कस्टडी या चित्रपटात दिसून आला होता. या चित्रपटात कृती शेट्टी आणि अरविंद स्वामी हे देखील मुख्य भूमिकेत होते.









