सांगरूळ प्रतिनिधी
स्वयंभूवाडी (ता. करवीर) येथील नागपंचमी यात्रा उत्साहात संपन्न झाली .पावसाची उघडीप असल्याने कोल्हापूरच्या पश्चिम भागातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती .मंदिर प्रशासन व ग्रामपंचायत
बोलोली यांच्या वतीने सुयोग्य नियोजन केल्यामुळे भाविकांना दर्शन रांगेतून चांगल्या प्रकारे दर्शन घेता आले .
स्वयंभूवाडी तालुका करवीर येथे दरवर्षी नागपंचमीनिमित्त मोठी यात्रा भरते . कोल्हापूरच्या पश्चिम भागातील करवीर तालुक्यासह पन्हाळा बावडा व राधानगरी तालुक्यातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात .
सोमवारी पहाटे दोन वाजता सरपंच पौर्णिमा कांबळे उपसरपंच दुर्गुळे सर्व सदस्य व मंदिराचे पुजारी केरबा गुरव यांच्या हस्ते अभिषेक घालून पूजा करण्यात आली .यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले .दिवसभर दर्शनाची मोठी रांग लागलेली होती .मंदिराचे पुजारी केरबा गुरव, पंडित गुरव व शिवाजी गुरव व व ग्रामपंचायत यांच्या वतीने दर्शनासाठी मंदिराच्या हॉलमध्ये रांगाचे योग्य नियोजन केल्यामुळे भाविकांना शांततेने व्यवस्थितपणे दर्शन घेता आले .दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला .