वृत्तसंस्था/ रोम
पुढील आठवड्यात येथे सुरु होणाऱ्या एटीपी टूरवरील इटालियन खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून स्पेनचा माजी टॉप सिडेड टेनिसपटू राफेल नदालने माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी घेतली आहे.
गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळताना नदालच्या मांडीला दुखापत झाली होती. हि दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नसल्याने त्याने इटालियन स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. चालू महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत त्याच्या सहभागाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. यापूर्वी त्याने माद्रिद, इंडियन वेल्स, मियामी, माँटेकार्लो आणि बार्सिलोना टेनिस स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला नाही.









