वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
स्पेनचा माजी टॉप सिडेड टेनिसपटू राफेल नदालने चालू महिन्याच्या उत्तरार्धात होणाऱ्या 2024 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
22 वेळेला ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविणाऱ्या राफेल नदालने या दुखापती समस्येमुळे जवळपास एक वर्ष टेनिस क्षेत्रापासून अलिप्त राहिल्यानंतर त्याने अलिकडेच ब्रिस्बेन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुनरागमन केले होते. या स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजलही मारली. पण ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉमसनने त्याचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभव करत उपांत्यफेरी गाठली होती. या सामन्यात खेळताना 37 वर्षीय नदालला पुन्हा दुखापतींच्या वेदना झाल्या. नदालने तातडीने स्पेनला प्रयाण करत या दुखापतीवर पुन्हा उपचारासाठी डॉक्टरांची भेट घेतली आहे. नदालने 2009 आणि 2022 साली ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती.









