वृत्तसंस्था/ बार्सिलोना
एटीपी टूरवरील पुढील आठवड्यात येथे सुरू होणाऱ्या बार्सिलोना खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून स्पेनचा अनुभवी आणि अव्वल टेनिसपटू राफेल नदालने तंदुरुस्तीच्या समस्येमुळे माघार घेतली आहे. सदर माहिती स्पर्धा आयोजकांनी शुक्रवारी दिली आहे. नदालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत विक्रमी 22 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत. बार्सिलोना टेनिस स्पर्धा येत्या शनिवारपासून खेळवली जाईल. मे-जून दरम्यान होणाऱ्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी तंदुरुस्तीची समस्या निर्माण होऊ नये याकरिता नदालने बार्सिलोना टेनिस स्पर्धेतून माघारीचा निर्णय घेतला









