वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
येथे सुरू असलेल्या एटीपी टुरवरील पुरूषांच्या ब्रिस्बेन खुल्या आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने बऱ्याच कालावधीनंतर आपले टेनिस क्षेत्रातील पुनरागमन केले. पण त्याला दुहेरीच्या सामन्यात हार पत्करावी लागली. जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर नदालचे या स्पर्धेत पुनरागमन झाले आहे.
37 वर्षीय नदालने आतापर्यंत 22 ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. 2024 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेला मेलबोर्नमध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नदाल उत्सुक आहे. दरम्यान पुरूष दुहेरीच्या झालेल्या सामन्यात नदाल आणि लोपेझ यांना ऑस्ट्रेलियाच्या थॉमसन आणि पर्सेल यांच्याकडून 4-6, 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला.









