वृत्तसंस्था/ रोम
एटीपी टूरवरील येथे सुरू होणाऱ्या पुरूषांच्या इटालियन खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सिडेड राफेल नदालचे पुनरागमन होणार आहे. या स्पर्धेत नदालचा सलामीचा सामना प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविणाऱ्या पात्र फेरीतील विजयी खेळाडू बरोबर होईल. नदालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 22 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली. क्लेकोर्टवरील स्पर्धेत नदाल हा सर्वात प्रभावी टेनिसपटू म्हणून ओळखला जातो. नदालने इटालियन टेनिस स्पर्धा यापूर्वी 10 वेळा जिंकली आहे. मध्यंतरी दुखापतीमुळे त्याला कांही स्पर्धा हुकल्या होत्या.
इटालियन टेनिस स्पर्धेत नदालची गाठ हुरकेझ तसेच डॅनिल मेदवेदेव आणि रूने यांच्याशी होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत इटलिचा जेनिक सिनेर आणि स्पेनचा अॅल्कारेझ हे सहभागी होणार नाहीत.









