खेड :
खेड जगबुडी नदीपात्रासह नारंगी नदीपात्रात साचलेला गाळ उपसण्याची प्रक्रिया अलोरे येथील जलसंपदा विभागाच्या मार्फत वेगाने सुरू असतानाच नाम फाऊंडेशनची यंत्रणाही बुधवारपासून सक्रिय झाली. नाम फाऊंडेशनने उपलब्ध करुन दिलेल्या यंत्रणांची पूजा करून गाळ उपसा प्रक्रिया सुरू करण्यात आली.
जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्याची प्रक्रिया 4 मार्चपासून गतीने सुरू आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाम फाऊंडेशनलाही गाळ उपसा करण्याच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवण्याची सूचना केली होती. यानुसार नाम फाऊंडेशनची यंत्रणा गाळ काढण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाली आहे.
याप्रसंगी शिवसेना उपनेते संजय कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, तालुका संघटक महेंद्र भोसले, युवासेना शहर अधिकारी मिलिंद काते, अनिल सदरे, किरण डफळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, नाम फाऊंडेशनचे सदस्य व व्यापारी उपस्थित होते.








