वृत्तसंस्था/ पुणे
येथे झालेल्या एटीपी टूरवरील 100 दर्जाच्या महाराष्ट्र खुल्या चॅलेंजर आतंरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या एन. जीवन आणि विजय सुंदर प्रशांत यांनी पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकाविले.
पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात एन. जीवन आणि विजय सुंदर या भारतीय जोडीने ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक बेल्डॉन आणि मॅथ्यू रोमिओस यांचा 3-6, 6-3, 10-0 असा पराभव केला. या जेतेपदाबरोबरच जीवन आणि विजय सुंदर यांनी 7 लाख रुपयांचे बक्षीस आणि 100 एटीपी गुण मिळविले. प्रशांतचे पुण्यामध्ये झालेल्या स्पर्धेतील तिसरे जेतेपद आहे.









