जिल्हा नियोजन समितीतून पारपोलीसाठी ८० लाखाचा निधी ; फुलपाखरांचे पर्यटन कायमस्वरुपी राहण्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न – रवींद्र चव्हाण
ओटवणे : प्रतिनिधी
पारपोली येथील फुलपाखरू महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाला वेगळी दिशा मिळणार असुन त्यातुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतील फुलपाखरांचे पर्यटन कायमस्वरुपी सुरु राहण्यासाठी नियोजनाची गरज आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.यावेळी रवींद्र चव्हाण यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुरत्न योजना राबविल्याने जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने सांगुन पारपोली गावाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८० लाखाचा निधी दिलेला आहे. त्यामुळे यापुढेही जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासनं दिले.यावेळी महोत्सवाच्या लोगोचे अनावरण तसेच फुलपाखरांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मानद वन्यजीव संरक्षक काका भिसे, प्रमोद परब, हेमंत ओगले, नितिन भिलारे, गौरेश तेजम, एकनाथ परब यांचा सन्मान करण्यात आला.
पारपोली येथील फुलपाखरू महोत्सवाच्या उद्द्घाटन प्रसंगी पालकमंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, तहसिलदार श्रीधर पाटील, अप्पर तहसिलदार मोनिका कांबळे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, बांधकाचे उपअभियंता वैभव सगरे, आर्किटेक अमित कामत, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक उपवनसंरक्षक डाॅ. सुनिल लाड, आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडगे, सावंतवाडी वनपरिक्षेत्रपान मदन क्षीरसागर आदी उपस्थित होते.









