वैज्ञानिकांनाही करता आली नाही उकल
जग हे रहस्यांनी भरलेले आहे. जगात अशी काही रहस्य आहेत, ज्यांची उकल वैज्ञानिकांना अद्याप करता आलेली नाही. आशियात लाओस नावाचा देश असून त्याला प्लेन ऑफ जार म्हणजेच जारचे मैदान म्हटले जाते येथे मोठमोठ्या दगडांनी तयार हजारो रहस्यमय मडके असून ते पूर्ण जगाला थक्क करून सोडतात.
लाओसच्या शियांगखुआंग प्रांतात 90 हून अधिक ठिकाणं आहेत, जथ्sाs 400 हून अधिक दगडाचे जार आहेत. अनेक मडक्यांवर वर दगडाचे झाकण देखील मिळाले आहे. या मडक्यांची उंची एक ते तीन मीटरपर्यंत आहे. व्हिएतनाम युद्धादरम्यान 1964-73 या कालावधीत अमेरिकेच्या वायुदलाने शियांगखुआंग प्रांतात 26 कोटीहून अधिक क्लस्टर बॉम्ब पाडविले होते, यातील अनेक बॉम्बचा स्फोट झाला नव्हता. दगडांचे जार असलेल्या अनेक भागांमध्ये हे बॉम्ब आजही तसेच पडले आहेत. परंतु काही ठिकाणांवरून या बॉम्ब हटविण्यात आले आहे.
हे हजारो रहस्यमय दगडी जार लोहयुगातील असल्याचे पुरातत्व तज्ञांचे मानण आहे. परंतु त्या काळात या जारची निर्मिती का करण्यात आली होती याचे उत्तर उपलब्ध नाही. बहुधा या दगडी जारचा वापर अंत्यसंस्कारावेळी अस्थिकलश म्हणुन केला जात असावा असे काही वैज्ञानिकांचे मानणे आहे. या रहस्यमय आणि अनोख्या ठिकाणाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. लाओसच्या सरकारने यासाठी अर्ज केला होता, ज्यानंतर 6 जुलै 2019 रोजी याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील करण्यात आले होते.









