दुसऱया टोकाचा आजपर्यंत लागला नाही शोध
जगात अनेक रहस्यमय जागा आढळून येतात. यातील अनेक रहस्यमय जागांबद्दल जाणून घेतल्यावर दंग व्हायला होते. वैज्ञानिकांनी यातील अनेक रहस्यांची उकल केली आहे, परंतु काही रहस्ये अद्याप कायम आहेत. पृथ्वीवर अशी अनेक रहस्यमय जंगल, पर्वत, नदी आणि बेट तसेच गुहा आहेत, ज्यांच्या रहस्यांची उकल करणे अद्याप शक्य झालेले नाही. अनेक ठिकाणी अज्ञात किंवा अदृश्य शक्ती, तर काही ठिकाणांना कथितस्वरुपात आत्म्यांमुळे रहस्यमयी मानले जाते.
बिहारमध्ये एक रहस्यमय गुहा असून त्याबद्दल जाणून घेतल्यावर लोकांना विश्वास बसत नाही, बिहारच्या मुंगेर जिल्हय़ातील या गुहेच्या रहस्याची उकल अद्याप कुणालाच करता आलेली नाही. ही गुहा आजही लोकांसाठी एक मोठे रहस्य आहे.

कुठल्याही गुहेत एका टोकाकडून शिरत दुसऱया टोकातून बाहेर पडता येते, परंतु बिहारच्या मुंगेर जिल्हय़ातील या गुहेत आत जाण्यासाठी मार्ग आहे, परंतु बाहेर पडण्यासाठी दुसऱया टोकाचा शोध आतापयर्तं कुणालाच लावता आलेला नाही. आजही लोक या गुहेच्या दुसऱया टोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत, ही गुहा 250 वर्षे जुनी असून याचा इतिहास अत्यंत रजक आहे. गुहा असलेल्या ठिकाणी आता एक उद्यान आहे. श्रीकृष्ण वाटिकेत ही गुहा मीर कासिमची असल्याचे सांगण्यात येते.
नबाब मीर कासिमने मुंगेरमध्ये गंगानदीच्या कष्टहरणी घाटानजीक 1760 मध्ये गुप्त गुहा निर्माण केल्याचे सांगण्यात येते. इंग्रजांच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी त्याने या गुहेची निर्मिती केली होती. याचे एक टोक आजही सुरक्षित दिसून येते. गुहेच्या दुसऱया टोकाबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात. गुहेचे दुसरे टोक मुंगेरच्या मुफस्सिल भागात पीर पहाडीनजीक असल्याची वदंता आहे, परंतु याची कुणीच पुष्टी केलेली नाही.
काय आहे इतिहास? नवाब मीर कासिम 1760 मध्ये मुंगेरमध्ये पोहोचला होता, त्याने बंगालची राजधानी मुर्शिदाबादहून मुंगेरला हलविली होती. मीर कासिम 1764 पर्यंत मुंगेरमध्ये राहिला होता असे काही इतिहासकारांचे सांगणे आहे. मुंगेर आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याठी शहराला किल्ल्यात बदलले होते









