अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात ‘33 थॉमस स्ट्रीट’ एक गगनचुंबी इमारत आहे. 40 मजली ही इमारत अत्यंत रहस्यमय आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या पूर्ण इमारतीत एकही खिडकी नाही. यामुळे या इमारतीत नेमके काय घडते असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत असतो. या प्रश्नांमुळे अनेक ऑनलाइन कॉन्स्पिरेसी थेअरींना जन्म मिळाला आहे. पिशाच्चांच्या अ•dयापासून ‘मेन इन ब्लॅक’ मुख्यालयापर्यंत याच्या दरवाजांमागे काय लपले आहे याविषयी अनेक थेअरीज आहेत. दिग्गज अभिनेता टॉम हँक्स देखील या इमारतीमुळे घाबरतो. 2017 मध्ये त्याने ही इमारत पाहिली होती, त्यानंतर त्याने ट्विटरवर ‘ही सर्वात भीतीदायक इमारत आहे, याच्या आत डब्ल्यूटीएफ चालते का?’ असे नमूद केले होते.
सोशल मीडियावर युजर्सनी याविषयी कॉन्स्पिरेसी थेअरी रचण्यास सुरुवात केली आहे. या इमारतीचे सत्य या कॉन्स्पिरेसी थेअरीज अनुरुप नाही. परंतु हे सत्य रंजक अन् कथितपणे यात काही रहस्यं देखील आहे. ही इमारत न्यूयॉर्क शहरात 33 थॉमस स्ट्रीटवर आहे. याला लाँग लाइन्स बिल्डिंग या नावाने देखील ओळखले जाते. 1969 आणि 1974 दरम्यान याला एटीअँडटी (अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ) कंपनीच्या टेलिफोन स्विचिंग इक्विपमेंट्स ठेवण्यासाठी तयार करण्यात आले होते, हे अमेरिकेतील सर्वात महत्त्वपूर्ण कम्युनिकेशन हबपैकी एक आहे. या उपकरणांसाठी हाय लेव्हल स्पेस आणि सिक्योर लोकेशनची गरज असते. याचमुळे इमारत 40 मजली टॉवर इतकी उंच असली तरीही प्रत्यक्षात तेथे केवळ 29 मजले आहेत. इमारतीला आण्विक हल्ल्याला तोंड देण्याच्या दृष्टीकोनातून डिझाइन करण्यात आले होते अशी देखील अफवा आहे.
आता कशासाठी होतो वापर?
1999 पर्यंत या इमारतीचा एटीअँडटीच्या दीर्घ अंतराच्या टेलिफोन एक्सचेंजच्या स्वरुपात वापर होत राहिला. तर आता या इमारतीचा वापर कधीकधी स्थानिक एक्सचेंज करियर्सकडून टेलिफोन स्विचिंगच्या स्वत:च्या मूळ उद्देशासाठी केला जातो. कथितपणे इमारतीच्या अन्य क्षेत्रांना हाय सिक्युरिटी डाटासेंटरच्या स्वरुपात वापरले जाते. याला आता एटीअँडटी बिल्डिंग किंवा लाँग लाइन्स बिल्डिंगऐवजी 33 थॉमस स्ट्रीट या नावाने ओळखले जाते.
इमारतीबद्दल रहस्य कायम
द इंटरसेप्टकडून 2016 च्या एका चौकशीतून इमारत जितकी दिसते, त्याहून अधिक भव्य असल्याचे आढळून आले आहे. काही कॉन्स्पिरेसी थेअरीजसोबत हा एक नॅशनल सिक्युरिटी एजेन्सीचा गुप्त तळ असल्याचे सांगण्यात आले. या इमारतीला एनएसएकडून टाटनपोइंटे हे कोडनेम देण्यात आल्याचेही द इंटरसेप्टच्या माध्यमातून म्हटले गेले. या चौकशीत एडवर्ड स्नोडेनकडून लीक करण्यात आलेले दस्तऐवजही सामील आहेत.









