प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-सुलधाळदरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. काही मार्गात बदल करण्यात आला आहे. म्हैसूर-बेळगाव विश्वकर्मा एक्स्प्रेस दि. 22 ते 28 जूनदरम्यान धारवाडपर्यंत धावणार आहे. बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस 23 ते 29 जूनदरम्यान धारवाड येथून निघणार आहे.
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन नैत्य रेल्वेने काही एक्स्प्रेसच्या कोचमध्ये वाढ केली आहे. बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेसला 20 जूनपासून एक स्लीपर क्लास कोच जोडला जाणार आहे. यामुळे म्हैसूर व बेळगाव येथील प्रवाशांची सोय होणार आहे.









