आसाममधील गाव, सर्वांना अवगत तंत्रमंत्र विद्या
मायोंग हे आसामच्या मोरीगाव जिल्हय़ातील ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले एक छोटेसे गाव आहे. मायोंग गावाला ‘भारतातील काळय़ा जादूची राजधानी’ या नावानेही ओळखले जते. हे गाव भूत-प्रेतांवर विश्वास ठेवणाऱया लोकांना अत्यंत पसंत आहे. मायोंग हे नाव संस्कृत शब्द ‘माया’वरून पडल्याचे काही लोकांचे सांगणे आहे. तर दीमास भाषेत मियोंग या शब्दाचा अर्थ हत्ती असा होतो.
मायोंगचा उल्लेख काही ऐतिहासिक ग्रंथांमध्येही आढळून येताहे. घटोत्कच हे मायोंगमधून अनेक जादूई शक्ती प्राप्त केल्यावर महाभारताच्या लढाईत सामील झाले हेत. काळय़ा जादूचा अभ्यास करणारे अनेक लोक अद्याप मायोंगच्या जंगलात पोहोचत असतात.
गावातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या काळय़ा जादूबद्दल जाणून आहे. स्थानिक लोक हस्तरेषा वाचण्याची कलाही बाळगून आहेत. येथील काही लाहेक भविष्य सांगण्याचे काम करतात आणि ही शक्ती पिढय़ांपासून प्राप्त असल्याचे ग्रामस्थांचे मानणे आहे. कुणाचेही दुःख दूर करण्यासाठी येथील लोक तांब्याच्या प्लेटला त्या ठिकाणी दाबून धरतात. असे केल्याने भूत-प्रेत यात सहाय्य करतात असे ग्रामस्थांचे सांगणे आहे. मायोंगमध्ये एक म्युझियम, मायोंग सेंट्रल संग्रहालय आणि एक एम्पोरियम देखील आहे, ज्यात टेप, अस्त्र आणि अनेक गोष्टींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
काळय़ा जादूमुळे मायोंग आता पर्यटक स्थळात रुपांतरित होत आहे. गावात प्राचीन आयुर्वेद आणि काळय़ा जादूवर काही पुस्तकांसह अनेक कलाकृती आणि पुरातात्विक अवशेष आहेत. मायोंगनजकी पोबितारा अभयारण्य असून यात एक शिंग असणारे गेंडे आहेत. मायोंग हे गुवाहाटीपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे.