Chandradeep Narke : मी धनुष्यबाणाचाचं आहे. माझा धनुष्यबाण तयार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताला आलो आहे. कणेरी मठाच्या महाउत्सवाची महाआरती पंचगंगेच्या काठी आहे. या महाआरतीला करवीर मतदार संघातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हजर आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची ही महायुती आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. अशी प्रतिक्रिया माजी आमदार चंद्रदिप नरके यांनी दिली.
कारखान्याच्या निकालानंतर चंद्रदिप नरके आक्रमक झाल्याचे बोलले जात होते या प्रश्नावर बोलताना चंद्रदिप नरके म्हणाले की, मी कारखान्याच्या निवडणुकीवेळी आक्रमक होतो. संयमी पण आहे. ज्याठिकाणी आक्रमकपणा दाखवायचो असतो त्याठिकाणी आक्रमकपणा दाखवतो. ज्या दिवशी माझा पराभव झाला त्याच्या पाचव्या दिवशी मी कामाला लागलो आहे. पुढच्या विधानसभेसाठी मी तयार असल्याचेही ते म्हणाले.
Chandradeep Narke Video–https://fb.watch/iNQ-clc8lb/
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









