बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सील आयोजित बारावी फिनिक्स चषक 14 वर्षाखालील आंरशालेय फुटबॉल स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून केएलई इंटरनॅशनल, मराठी विद्यानिकेतन, इस्लामिया संघानी आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करीत बाद फेरीत प्रवेश केला. तर केएलएसने फिनिक्सला तर एमव्हीएमला शून्य बरोबरीत रोखले. 14 वर्षाखालील मुलांच्या सामन्यात केएलई इंटरनॅशनलने भातकांडे संघाचा 4-0 असा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात मराठी विद्यानिकेतनने शेख सेंट्रलचा 2-0 असा पराभव केला. तिसऱ्या सामन्यात फिनिक्स संघाला केएलएसने शुन्य बरोबरीत रोखले. चौथ्या सामन्यात इस्लामियाने भरतेश संघाचा 4-0 असा पराभव केला. पाचव्या सामन्यात विजया संघाने एमव्हीएमला शून्य बरोबरीत रोखले. 17 वर्षाखालील मुलींच्या सामन्यात सेंट जोसेफने मराठी विद्यानिकेतनचा 1-0 असा निसटता पराभव केला. सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 25 व्या मि. ला. जोसेफच्या वैष्णवी संकपाळने गोल करून 1-0 ची आघाडी जोसेफला मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात फिनिक्स संघाने विजया संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 18 व 29 व्या मि.ला फिनिक्सच्या गौतमी सुतारने गोल करून 2-0 ची महत्वाची आघाडी मिळवून दिली.
मंगळवारचे बाद फेरीचे सामने
- मराठी विद्यानिकेतन वि. कनक मेमोरियल-सकाळी 9 वा.
- इस्लामिया वि. विजया-सकाळी 10 वा.
- सेंटपॉल्स वि. ज्योती सेंट्रल-सकाळी 11 वा.
- सेंट झेवियर वि. केएलई-दुपारी 12 वा.
- पहिल्या सामन्यातील विजेता वि. केएलएस-दुपारी 2 वा.
- दुसऱ्या सामन्यातील विजेता वि. संजय घोडावत-दुपारी 3 वा.









