इस्लामपूर : बनावट दस्त करून १२ गुंठे जमिनीची २५ लाख रुपयांना परस्पर विक्री केलेल्या प्रकरणातील संशयित ९ जण अद्याप फरारी आहेत. मंडलाधिकारी, तलाठी, स्टॅम्प व्हेंडर यांच्यासह १० जणांवर फसवणूक आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी विजय पाखरे ( रा. इस्लामपूर, सध्या रा. शेरे, ता. कराड) यांनी फिर्याद दिली होती.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधारविजय संभाजी जाधव याच्यासह सुजित थोरात, निलेश बडेकर, अरुण गवळी, सोमनाथ माने, कुलदीप जाधव, किर्तीकुमार पाटील, तलाठी विठ्ठल कांबळे, मंडलाधिकारी संभाजी हांगे, स्टॅम्प व्हेंडर सुरेश सावंत या संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. निलेश बडेकर याला अटक करण्यात आली असून त्याची न्यायायलीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विजय पाखरे यांच्या परस्पर विजय जाधव व निलेश बडेकर यांनी १२ गुंठ्याचा बनावट दस्त तयार केला. तलाठी कांबळे यांनी दस्ताची नोंद केली. तर मंडलाधिकारी हांगे यांनी ही नोंद मंजूर केली होती. त्यानंतर १२ गुंठे जमीन जाधव याने सुजित थोरात याला विकली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर विजय पाखरे यांनी या प्रकरणातील संशयितांविरोधात फसवणूक व अॅट्रॉसिटी कलमाअंतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बडेकर याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास विटा विभागाच्या पोलिस उपअधीक्षक पद्मा कदम करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








