135 कोटी रुपये उभारणार : वित्त क्षेत्रातील कंपनी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वित्त क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी मुथूट मायक्रोफिन यांचा लवकरच प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओ सादर केला जाणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी आगामी काळात 1350 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. आयपीओ सादरीकरणासाठीची आवश्यक कागदपत्रे कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे सुपूर्द केलेली आहेत.
महिलांना कर्ज पुरवठा
देशातील ग्रामीण भागातील महिलांना ही कंपनी कर्जपुरवठा करते. या कर्जाच्या माध्यमातून महिला रोजगाराच्या क्षेत्रात कार्यरत होत आर्थिकदृष्ट्या भक्कम होण्यासाठी प्रयत्न करत असतात. या योगे कंपनीने दक्षिणेत आपले जाळे विणले आहे. नव्या ताज्या समभागाच्या सादरीकरणातून 950 कोटी रुपये उभारण्याचा मानस कंपनीने केला आहे. थॉमस जॉन मुथूट, थॉमस मुथूट, थॉमस जॉर्ज मुथूट, प्रीती जॉन मुथूट, रेमी जॉर्ज व निना जॉर्ज हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.
देशातील चौथी मोठी कंपनी
भारतातील कर्ज देणारी चौथी मोठी तर दक्षिण भारतातील तिसरी बिगर बँकिंग क्षेत्रातील मोठी कंपनी म्हणून मुथूट मायक्रोफिनचा उल्लेख केला जातो. केरळ व तामिळनाडूमध्ये कंपनीचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे.









