वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशचा अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजूर रेहमानला डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बांगलादेश प्रिमियर लिग स्पर्धेसाठी सराव सत्रात रेहमानच्या डोक्याला दुखापत झाली होती.
बांगलादेशचा फलंदाज लिटॉन दास आणि मुस्ताफिजुर रेहमान यांच्यात नजरचुकीने टक्कर झाल्याने रेहमानच्या डोक्याला दुखापत झाली. या दुखापतीतून रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्याला तातडीने येथून एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 28 वर्षीय रेहमानवर वैद्यकिय इलाज चालू असून त्याच्या प्रकृतीमध्ये लवकरच सुधारणा होईल, असे सांगण्यात आले.









