ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिरोळ (कोल्हापूर) : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत पैगंबर महम्मद यांचेबद्दल अपमानास्पद वक्तव्य करुन मुस्लिम धर्माची भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शिरोळ (Shirol) तहसील कार्यालयावर आज भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपच्या तात्कालीन प्रवक्त्या नुपुर शर्मा (Nupur Sharma)यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिरोळ तालुक्यातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली. मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार डॉ अपर्णा मोरे- धुमाळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तहसीलदार मोरे -धुमाळ यांनी आपल्या भावना शासन दरबारी पोहोचवण्याचे आश्वासन दिले. तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने यांनाही निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, एका वृत्तवाहिनीच्या वादविवादात भाजपच्या तात्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी महम्मद पैगंबर यांच्या विरोधात अपशब्द वापरले होत. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक श्रद्धेचा अपमान करून, धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे नुपूर शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली. कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
हेही वाचा- ‘मविआ’तील दुफळीचा भाजपला फायदा होणार-चंद्रकांत पाटील
या आंदोलनाचे नेतृत्व धर्मगुरू कारी रहमतुल्लाह इराणी,इम्रान सनदी, इकबाल मेस्त्री, सय्यद पटेल, अफसर पटेल, असीम पठाण,दादेपाशा पटेल, अतिक पटेल,अफसर पटेल, असीम पठाण,दादेपाशा पटेल, अतिक पटेल, रुस्तम मुजावर, शहानवाज मनेर, ॲड अजीज पटेल, रमजान मुल्ला, मौलाना असूद मजीद साहब, मौलाना अहमदुल्लाह साहब, मौलाना जमाल आदींनी केले. यावेळी तालुक्यातील मुस्लिम समाजातील कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.